पटेल हत्याकांडातील आरोपीचे रेखाचित्र जारी

Foto
औरंगाबाद:-  कुरिअर कंपनीच व्यववस्थापक प्रकाश भाई पटेल यांची 31 जानेवारी रोजी नगरखानागल्लीत दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती.या हत्याकांडाच्या तपासासाठी पोलिसांचे पथक गुजराथ ला गेले होते.मात्र तेथून ते रिकामेच परतले आहे. त्यामुळे वर्षभरानंतरही उधोजक पारस छाजेड यांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या सुगावा लागला नाही तसेच आव्हानात्मक  पटेल हत्याकांड प्रकरण होत चालले आहे.

दरम्यान औरंगाबाद पोलिसांनी आज आरोपीचे रेखा चित्रजरी केले आहे. मारेकऱ्याने तोंडाला रुमाल बांधल्याने सीसीटीव्हीमधील फुटेजमध्ये ओळख होत नसल्याने रेखाचित्र  जरी केले 

 दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन हल्लेखोरांनी प्रकाश पटेल यांच्यावर दिवसाढवळ्या 31 जानेवारी रोजी नगरखाना गल्लीत हल्ला केला होता.हे हत्याकांड घडून अकरा दिवस उलटले आहे. पटेल हे मूळचे गुजराथ चे असल्याने या हत्येचे धागेदोरे गुजराथशी जोडलेले असावे  असा संशय पोलिसांना होता.त्यासाठी सिटीचौक पोलीस ठाण्याचे एक पथक मागील अनेक दिवसांपासून गुजराथ मध्ये तळ ठोकून होते.तेथे पथकाने अनेकांची चौकशी केली मात्र चौकशीत काहीही महत्वाचे निष्पन्न झाले नाही.शेवटी निराश होऊन सिटीचौक पोलिसांना रिकाम्या हातानीच औरंगाबाद ला परतावे लागले.सिटीचौक पोलिसांचे पथक 9 फेब्रुवारी रोजी शहरात परतले.त्यामुळे दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने शहराला हादरवून टाकणारे तिने हल्ले खोर मोकटाच आहे.

पोलिसांपुढे आव्हान 

30 जानेवारी 2019 रोजी  सुराणानगर या उच्चभ्रू वसाहती मध्ये राहणारे  उद्योजक पारस छाजेड यांच्या परिवारावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता.या घटनेला वर्ष उलटले आहे.औरंगाबाद शहर पोलिस समुद्रातून सुई शोधण्याची धमक ठेवते मात्र छाजेड  प्रकरणात वर्षभरात पोलिसांना अपयश आले आहे. असेच पटेल हत्याकांड प्रकरणात तर होणार नाही ना? अशी चर्चा शहरात सुरु आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker